TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर दगडफेक, जाळपोळप्रकरणी ३०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल, १४ जणांना अटक ; शहरात तणावपूर्ण शांतता !

नागरिकांनी शांतता ठेवावी ; विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन !

vijay waghmare by vijay waghmare
June 22, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा, या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात दगडफेक झाली होती. या दुदैवी घटनेत पोलीस निरीक्षकांसह ७ ते ८ पोलीस जखमी झाल्याची घटना २० रोजी रात्री घटली होती. परंतु, गुरुवारच्या घटनेनंतर जामनेर शहरात आज पोलिसांच्या बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप आले असून शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली. दरम्यान, या घटनेप्रकरणी जवळपास ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास एलसीबीचे वरिष्ठ पो. नि. बबन आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दत्तात्रय कराळे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात भेट देऊन या घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच सर्वांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत, तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शहरात शांतता ठेवावी, असे आवाहन केले. दरम्यान, तालुक्यातील एका गावात केकतनिंभोरा येथील सुभाष उमाजी भील (वय ३५) या नराधमाने ११ जूनला सहा वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून केळीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची तेथेच निघृणपणे हत्या केली होती. त्यानंतर हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. या घटनेला १० दिवस उलटून ही आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे जामनेर पोलीस ठाण्याच्या वतीने या आरोपीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते. २० रोजी सायंकाळी गुन्हा अन्वेषण विभाग व भुसावळ पोलिसांनी सुभाष भील यास भुसावळ येथील तापी नदीच्या परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली. त्यानंतर त्याला चौकशीसाठी जळगाव येथे नेण्यात आले होते. परंतु, सुभाष भील याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी संतप्त आदिवासी समाज बांधव करत होते. तर पोलिसांकडून त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत होते.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

रात्री जामनेर शहरातील पोलीस ठाण्यासमोर जमावाने ठिय्या आंदोलन करून महामार्ग रोखला. तसेच टायर ही जाळले होते. एवढेच नाही तर पोलीस ठाण्यावर दगडफेक करून रुग्णवाहिका, खासगी ट्रॅव्हल्ससह पोलीस गाड्यांच्या काचा फोडल्या तसेच दुचाकी जाळून नासधूस केल्याने दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करून लाठीचार्ज ही करावा लागला होता. जळगाव, धुळे आदी ठिकाणाहून दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा अधिक फौजफाटा ही मागवण्यात आला होता. या घटनेत पोलीस निरीक्षकासह ७ ते ८ पोलिसांना गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जखमींची आज विचारपुस केली.

वरिष्ठ अधिकारी जामनेरात दाखल; पोलिसांनी काढला रुटमार्च

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर आणखी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आला होता. तर सदर घटनेतील दोषींवर त्वरीत कठोर कारवाई केली जाईल, असे सांगून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संशयिताला २५ पर्यंत पोलीस कोठडी !
जामनेर तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिव्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपीला शुक्रवारी २१ जून रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती शरद पवार यांनी त्याला २५ जून पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटना घडल्यापासून सुभाष भील हा फरार होता. त्याला गुरुवार, २० जून रोजी रात्री १० वाजता त्याला भुसावळ शहरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवार, २१ जून रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. शरद पवार यांनी पाच दिवसांची २५ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी, सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी युक्तीवाद केला.

यांच्यावर दाखल झाले आहेत गुन्हे !
या प्रकरणी पो.उ. नि. दीपक रिठे यांच्या फिर्यादीनुसार जामनेर शहरासह तालुक्यातील संशयित आरोपी शालूसिंग शेवाळे, अशोक भील, श्रीराम भील, पंकज ठाकरे, प्रमोद सुरवाडे, युवराज पवार, आकाश पवार, प्रदीप कोळी, रितेष मोरे, अमोल सोनवणे, मंगल ठाकरे, दीपक पवार, आकाश पवार या १३ संशयितांसह ३०० ते ४०० महिलांसह पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसआरपीच्या ६ तुकड्या तैनात ; शहराला आले छावणीचे स्वरुप !
जामनेर शहराच्या इतिहासातील पोलीस ठाण्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. राज्य राखीव पोलीस दल बलगट क्रमांक सहाच्या तीन तुकड्या, जळगावसह आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. चाळीसगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, गुन्हा अन्वेषण विभागाचे पो. नि. बबन आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे आदी अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. तर शहरात शांतता प्रस्थापित करण्यात आलेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 14 jaṇānnā aṭaka; śaharāta taṇāvapūrṇa śāntatā!jāḷapōḷaprakaraṇī 300 jaṇānvirud'dha gunhē dākhalaJāmanēra dagaḍaphēka

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

दुष्काळी महसुली मंडळातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विनाविलंब माफ करा : साहेबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतात केला महिलेचा खून, एकाला अटक ; पोलीस तपासात समोर आले धक्कादायक कारण !

May 3, 2023

सलीम इनामदार यांची राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड !

June 22, 2021

आधी म्हणाला ताई मासे घ्या…नंतर घरात घुसून केला विवाहितेचा विनयभंग ; पारोळा पोलिसात गुन्हा !

September 9, 2022

हद्दपार आरोपीसह आश्रय देणारे आई-वडीलही अटकेत ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group