जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. गोविंद शांताराम वाघ (वय ३२), असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.
संबंधित शाळकरी मुलगा शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना वाटेतील एका गावातील मुलगा वाघ याच्या गाडीवर बसला. वाटेत या मुलावर गोविंद वाघ याने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गोविंदला ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी पॉक्सोअंतर्गत वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
















