TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरच्या शिक्षकाचा शिक्षण उपसंचालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न !

शालार्थची फाईल मंजुरीला विलंब करत वेगवेगळ्या कारणांनी त्रास : खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2021
in गुन्हे, जामनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) शालार्थच्या फाईलवर चार महिने उलटूनही शिक्षण उपसंचालक स्वाक्षरी करुन मंजुरी देत नाहीये. शिक्षण उपसंचालकांच्या याच जाचाला कंटाळून जामनेर येथील एकलव्य या शिक्षण संस्थेत नोकरी असलेल्या एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. संबंधित शिक्षकाची प्रकृती नाजूक असल्याचे कळते.

 

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

शालार्थची फाईल प्रलंबित असल्यामुळे काम करुनही संस्थेकडून त्याचा मोबादला मिळत नाहीये. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही शिक्षण उपसंचालकांकडून फाईल मंजुर न करता त्रास दिला जात असल्याने या छळाला कंटाळून जामनेर तालुक्यातील एकलव्य या शिक्षण संस्थेत नोकरी असलेल्या भारत बाबुलाल रेशवाल शिक्षकाने शनिवारी विषारी पदार्थ खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने कुटुंबियांनी त्यांना भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या रेशवाल यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान कागदपत्रांची पूर्तता करुनही शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याच्यांकडून रेशवाल यांची फाईल कोणत्या कारणाने अडविण्यात आली आहे?, या मागे नेमका त्यांचा उद्देश काय?, शिक्षकाचा जीव गेल्यावर उपसंचालक फाईलवर स्वाक्षरी करतील काय? असाही प्रश्‍न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

 

सात वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने शाळेत पुन्हा रुजू

 

भारत रेशवाल यांची पत्नी अंकिता रेशवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जामनेर येथील एकलव्य शिक्षण संस्था व संस्थेत कार्यरत शिक्षक भारत बाबुलाल रेशवाल यांच्या वाद होता. त्यामुळे रेशवाल यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तब्बल सात वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर रेशवाल यांना न्याय मिळाला. उच्च न्यायालयाने रेशवाल यांना शाळेत पुन्हा रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२० रोजी भारत रेशवाल पुन्हा शिक्षक म्हणून एकलव्य शिक्षण संस्थेत रुजू झाले. रूजू झाल्यानंतर शालार्थ संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करत रेशवाल यांनी स्वतः प्रस्ताव शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याकडे जमा केला.

 

तब्बल चार महिन्यांपासूनच फाईल पडून

तब्बल चार महिन्यांपासून ही फाईल शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडे पडून आहे. इतर फाईलवर उपासनी यांनी मंजूरी दिली मात्र रेशवाल यांच्या फाईल अडकवून ठेवली आहे. फाईल प्रलंबित असल्याने रेशवाल यांना नोव्हेंबरपासून संस्थेकडून वेतनापोटीचा एक रुपयाही मिळालेला नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यात रेशवाल यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडून त्रास दिला जात असून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी उपासनी यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप देखील अंकिता रेशवाल यांनी केला आहे.

 

आपल्याकडून कोणतीही अडवणूक नाही : उपासनी

 

संबंधित शिक्षक आणि संस्थेचा वाद होता. न्यायालयाच्या आदेशाने ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. निलंबित काळातील पगाराची भरपाई संस्थेने द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता झाल्याबरोबर सेवेत पुन्हा हजर झाल्यापासूनचा त्यांचा पगार तात्काळ सुरु करण्यात येईल. रेशवाल यांची कुठल्याची प्रकारची अडवणूक करण्यात आलेली नाहीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव परिचारिका खून प्रकरण : हत्येपूर्वी दिल्या चहातून झोपेच्या गोळ्या !

September 10, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ७ सप्टेंबर २०२२ !

September 7, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य १४ ते २० ऑगस्ट २०२२ !

August 14, 2022

तुम्ही महाराष्ट्राशी पंगा घेतलाय, मोदीजी आप तो गयो : संजय राऊत !

May 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group