धरणगाव (प्रतिनिधी) येथे जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. जी. गुजराथी मूक-बधिर विद्यालय, मतिमंद निवासी अनिवासी विद्यालय व मुकबधीर कार्यशाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ध्वजारोहण गुलाबराव रतन वाघ (अध्यक्ष शासकीय समन्वय समिती धरणगाव तथा शिवसेना जिल्हाप्रमुख जळगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. रमेश पगारिया (अध्यक्ष मेडिकल असोसिएशन) यांच्या हस्ते सेमिनार हॉलची उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील पहिली दिव्यांग विशेष शाळेची क्यूआर कोड असलेली शैक्षणिक संस्थेच्या वेबसाइटचे उद्घाटन डॉ. प्रेमराज पाटील (सहाय्यक पशुधन अधिकारी धरणगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. निलेश सुरेश चौधरी (लोकनियुक्त नगराध्यक्ष न.पा.धरणगाव) यांच्या हस्ते संस्थेचे नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत मध्ये नवनिर्वाचित सदस्य गोकुळ पाटील (दहिदुले), सुनंदाबाई पांडुरंग पाटील (पिंपळे), प्रतिभा वाल्मिक पाटील (सांगवी) यांचा सत्कार संस्थेचे सचिव माया पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपक्रमशील शिक्षक म्हणून ऋषिकेश जाधव (मुख्याध्यापक मतिमंद विद्यालय धरणगाव) यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गुणवंत व माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आर डी पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तावना आर एच पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन संतोष भडांगे यांनी केले. कार्यक्रमास प्रदीप सोनवणे, अनिल पगारिया, एकनाथ पाटील, अरुण पाटील, वसंत पाटील, रुपाली पाटील, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी ते साठी मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव, विशेष शिक्षक आर एच.पाटील, नंदकुमार पाटील, दिपक जाधव, संतोष भडांगे, किशोर पाटील, चंद्रराव पाटील, आनंत जाधव, योगेश पाटील, दिलीप पाटील, उमेश पाटील, कल्पना ठाकरे, आरिफ शहा, राकेश पाटील आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.