जळगाव (1 जानेवारी 2025) ः नववर्षाच्या पूर्व संध्येला मद्य प्राशन करून वाहन चालवणार्यांविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली या नाकेबंदीत मद्य प्राशन करून वाहन चालविणार्या 150 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.
150 वाहन धारकांवर कारवाई
सरत्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण होते मात्र अशा उत्साही वातावरणात तरुणाई मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन करून वाहने चालवतात व आपल्या किंवा दुसर्याच्या अपघाताला कारणीभूत ठरतात. यामुळे अशा घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यासह जळगाव शहरात ठिक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी रात्री वाहन धारकांची तपासणी केली असता 150 वाहनधारक ड्रंक करून ड्राईव्ह केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार असून न्यायालय अशा वाहनधारकांना किमान दहा हजार रुपयांचा दंड ठोठावू शकते, असे जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले.