TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शॉर्टसर्कीटमुळे चटई कंपनीच्या गोडावूनला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण करीत आजूबाजूच्या तीन कंपन्यांना देखील विळख्यात घेतले. या आगीमुळे एका कंपनीतील पाच गॅस सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे संपुर्ण परिसर हादरुन गेला होता. यामध्ये कंपनीत तयार झालेल्या मालासह मशिनरी जळून खाक झाले. आग ही चौथ्या कंपनी पर्यंत पोहचणार त्यापुर्वीच नियंत्रण मिळविल्यामुळे ती कंपनी सुरक्षीत राहीली. ज्याठिकाणी ही आग लागली त्याच्या समोर गॅस सिलींडरचे गोदाम आहे. आग लागल्यानंतर सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे परिसरात खळबळ माजून गेली. परंतू कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत गॅस गोडावूनच्या बाहेर असलेल्या वाहने तात्काळ तेथून दूर अंतरावर नेवून उभी केली. ही घटना शनिवार दि. २ मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जे सेक्टरमध्ये घडली. कंपन्यांना सुटी असल्यामुळे सुदैवाने कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.

शहरातील एमआयडीसी परिसरातील जे – ४० सेक्टरमध्ये दिग्विजय बनवट यांच्या मालकिची नवकार चटई नावाची कंपनी असून त्याच्या शेजारी त्यांनी भाडेतत्वावर तयार झालेला माल ठेवण्याकरीता गोदाम घेतले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीटमुळे गोदामाला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर आगीने शेजारी असलेल्या पावडर कोटींग करणाऱ्या कंपनीला आगीच्या विळख्यात घेतले. त्यामुळे याठिकाणी असलेले गॅस सिलींडरचा स्फोट झाला एकापाठोपाठ एक असे एकूण पाच सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे आगीच्या ज्वाला आणि धूराचे लोळ उंचच उंच आकाश उडत होते, प्लास्टीक असल्यामुळे ही आग अधिकच भडकली. त्यामुळे
कंपनीतील तयार व कच्चा माल आगीत सापडला. प्लास्टिक माल व त्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग शेजारी असलेल्या सोपान अटक यांच्या मालकीच्या श्रीनिवास पॉलिमर्स कंपनीपर्यंत पोहचली. परंतू ही कंपनी आग लागलेल्या – कंपनीपासून दूर असल्यामुळे येथे लवकर आगीवर नियंत्रण – मिळविण्यात आले.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

हेअर ऑईलच्या कंपनीपर्यंत पोहचली आग

जे ४० सेक्टरमधील कंपन्यांची ही आग त्यांच्या पाठीमागेच असलेल्या जे ४७ सेक्टरमधील जे ब्रदर्स या हेअर ऑईल – कंपनीपर्यंत पोहचली. आगीने या कंपनीला आपल्या विळख्यात घेत असतांना महापालिका अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तर दुसरीकडे भारत गॅस गोडावूनमधून थेट दोन पाईप जोडून कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या – आगीत कंपनीचे किरकोळ नुकसान झाले असल्याची माहिती कंपनी मालक विनय जगवानी यांनी दिली.

मदतीसाठी धावले गॅस कंपनीतील कर्मचारी

गॅस गोदामाच्या समोरील कंपनीला आग लागताच भारत – गॅस प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी धाव घेतली. या प्लांटमधील उत्पादन थांबवून जवळपास – ५० कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्लांटमधील – अग्निशमन यंत्रणेचे पाईप या कंपन्यांपर्यंत जोडून पाण्याचा मारा करीत आग विझविण्यासाठी मदत केली. त्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात दिला नसता तर आगीने आणखीन रौद्र रुप धारण करीत इतर कंपन्यांपर्यंत आग पोहचली असती.

दोन तासानंतर मिळविले आगीवर नियंत्रण

आग विझविण्यासाठी महापालिका अग्नीशमन दलाचे, जैन इरिगेशनचे एकूण १० ते १५ बंब घटनास्थळी पोहचले. बंब रिकामे झाल्यानंतर ते तात्काळ गॅस गोदामासह रेमण्ड व इतर कंपन्यांमधून भरुन घटनास्थळी आणले जात होते. सुमारे ३० ते ४० बंबांसह फोमचा मारा केल्यानंतर दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच विशेष म्हणजे गॅस प्लांटमधून कंपन्यांजवळ उभ्या बंबांपर्यंत पाईप टाकून बंबांमध्ये पाणी भरले जात होते.

अग्निशमन विभागाची तत्परता

आगीवर नियंत्रण मिळविण्याकरीता महापालिकेतील एमआयडीसी परिसरातील अग्निशमन विभागातील प्रदीप धनगर, निवांत इंगळे, योगेश कोल्हे, राकेश सोनवणे, किरण पाटील, रितेश पाटील, केतन पाटील, दीपक पाटील, भुषण पाटील, शोएब तडवी, नितीन ससाणे यांच्यासह भारत गॅसमधील कर्मचाऱ्यांनी मदत केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThree companies were rocked by the fire MIDC explosion

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२२ वर्षीय तरुणाने ‘या’ कारणातून संपवलं जीवन !

May 3, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, २ झाले बरे !

September 25, 2021

धरणगाव शहरात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

March 6, 2025

राज्य सरकारनं अवैध वाळू उपशाविरोधात केली दक्षता विभागाची घोषणा !

June 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group