जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागांतर्गत COVID केअर सेंटर/ रुग्णालये/ दवाखान्याकरिता “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय आया” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही मुलाखत देता येणार आहे. मुलाखतीची तारीख १७ जानेवारी २०२२ आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय आया
पदसंख्या – विविध पदे
शैक्षणिक पात्रता – 10th/ 12/ M.Sc/ B..Sc/ Any Graduation/ MBBS (Refer PDF)
नोकरी ठिकाण – जळगाव
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहू नगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव
मुलाखतीची तारीख – १७ जानेवारी २०२२