जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व पत्रकार, इलेक्ट्रिक माध्यमांचे पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते यांना कोरोना लस देण्यात यावी, अशी मागणी आ. सुरेश भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी म्हंटल की, महाराष्ट्रात व देशभरात कोरोनाच्या भीषण परिस्थितीला मागील १४ दिवसांपासून सामोरे जात आहोत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्वतापरी प्रयत्न करत आहोत. मात्र या सर्वांमध्ये लोकशाहीचे ४ थे आधार स्तंभ म्हणजे पत्रकार बांधव हा वर्ग आहे. जो आपल्या जीवाची पर्वा न करता फिल्डवर उतरून काम करत आहे.
कोरोना काळात पत्रकार, इलेक्ट्रिक माध्यमांचे पत्रकार घटना कोणतीही झाली असेल किंवा दंडात्मक कारवाई असेल, विविध बैठका असेल किंवा इतर काही काम असेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आपले कर्तव्य बजावत आहे. संपूर्ण धोका पत्करून नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्याचे काम करत आहे. या दरम्यान काही पत्रकारांना कोरोनाची लागण सुद्धा झाली होती. त्यात महाराष्ट्रात काही पत्रकारांचा मृत्यू देखील झाला असून त्यामुळे पत्रकार आज काम तर करत आहेत. त्यामुळे आता जर लसीकरण चालूच आहे तर इतर आवश्यक सेवेतील लोकांना जसी लस दिली तशीच लस मुख्यत्वे करून सर्व पत्रकार, इलेक्ट्रिक माध्यमांचे पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते यांना देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुरेश दामू भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.