TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला हॉस्पीटलमध्ये जंबो कोविड केअर सेंटर !

८०० रूग्णांची होणार व्यवस्था ; पालकमंत्र्यांनी केली पाहणी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोविडग्रस्तांची वाढती संख्या पाहता अनेक रूग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, मोहाडी रोडवर पूर्णत्वाकडे आलेल्या महिलांच्या रूग्णालयात जंबो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. यात तब्बल ८०० रूग्णांवर उपचाराची व्यवस्था होणार असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी हॉस्पीटलची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रूग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, मोहाडी रोडवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या महिलांच्या हॉस्पीटलमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. याची तयारी पूर्णत्वाकडे आली असून ५ एप्रिल रोजी हे सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

या अनुषंगाने आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महिला रूग्णालयाची पाहणी केली. यात त्यांनी सध्या सुरू असणार्‍या कार्याचा आढावा घेऊन माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, महानगर प्रमुख शरद तायडे नगरसेवक अमर जैन गणेश सोनवणे सरपंच धनंजय सोनवणे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व सिव्हील सर्जन यांना या हॉस्पीटलमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या प्रणालीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. या हॉस्पीटलमध्ये जनरल बेड, ऑक्सीजन बेड आणि व्हेंटीलेटर्स या तिन्ही प्रकारातील रूग्ण सेवा उपलब्ध राहणार आहेत.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण सहकार राज्यमंत्री असतांना फक्त महिलांसाठी अद्यायावत असे रूग्णालय उभारण्यासाठी मान्यता मिळवून आणली होती. मोहाडी रोडवरील प्रशस्त जागेत या हॉस्पीटलचे काम सुरू करण्यात आले असून आता ते पूर्णत्वाकडे आले आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या हॉस्पीटलमध्ये पहिल्यांदा १०० बेडची व्यवस्था करण्यात येत असून गरज भासल्यास येथे तब्बल ८०० बेडचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामुळे जिल्हा शासकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयावर पडणारा लोड कमी होणार असून प्रत्येक रूग्णाला अद्यायावत उपचार मिळणार आहे. पाळधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून येत्या काही दिवसांमध्ये याच प्रमाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले.

असे आहे हॉस्पीटल

ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी ते सहकार राज्यमंत्री असतांना तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या माध्यमातून मोहाडी रोडवर फक्त महिलांसाठीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलला मान्यता मिळाली होती. यासाठी तब्बल ७५ कोटी ३१ हजार रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यात हॉस्पीटल, अधिकारी व कर्मचार्‍यांची निवासस्थाने, सुशोभीकरण आणि परिसरासाठी पाणी पुरवठा योजना आदींचा समावेश होता. हे हॉस्पीटल तब्बल एक लाख चौरस फुटाच्या क्षेत्रातमध्ये उभारण्यात येत असून याचे बांधकाम हे भूकंपरोधी प्रणालीनुसार करण्यात आले आहे. हे हॉस्पीटल तीन मजली असून यातील तळ मजल्यावर स्वागतकक्ष, स्पेशल वॉर्ड तर दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर ओपीडी, ऑपरेशन कक्ष आणि जनरल वॉर्ड असणार आहे. सदर हॉस्पीटल हे टेकडीवर असून हवेशीर व प्रशस्त ठिकाणी आहे. अशा प्रकारचे फक्त महिलांसाठी असणारे हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पीटल असून कोविड सेवेच्या माध्यमातून ते सुरू होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

खळबळजनक ! उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेशोत्सवानिमित्त चाळीसगाव वासियांसाठी दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी !

September 7, 2024

धक्कादायक ! जळगावात चाकूने हल्ला करत तरुणाचा खून

March 26, 2022

खळबळजनक : मधुमेहावरील औषध घेतल्यानंतर थोड्याच वेळात दाम्पत्याचा अचानक मृत्यू !

June 2, 2023

आदर्शगाव जवखेडा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड

February 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group