धरणगाव (प्रतिनिधी) माळी समाज (मोठा माळी वाडा) समाज पंच मंडळातर्फे कोविड – १९ चा पार्श्ववभूमीवर धरणगाव येथील रुग्णालयात ना. गुलाबराव पाटील यांनी उपलब्ध करुण दिलेल्या रुग्णवाहिकेत प्रवासादरम्यान रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सीजन कीटची कमतरता भासत होती. त्यामुळे काही प्रसंगी रुग्ण हा दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच दगावत असे. या गोष्टीचे ग्राभीय घेऊन माळी समाज अध्यक्ष व पंच मंडळ यांच्याकडुन रुग्णवाहिकेस जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व कीट उपलब्ध करून देण्यात आले.
त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाचे प्राण वाचवण्यास मदत तर होईलच. त्याचप्रमाणे गावातील व ग्रामीण भागातील रुग्णास मुंबई-पुणे पर्यंत नेल्यास मदत होणार आहे. समाज अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांनी जम्बो सिलेंडर नगरअध्यक्ष निलेश चौधरी यांच्या उपस्थितीत सुपूर्त केले. याप्रसंगी माळी समाज पंच मंडळाचे विशवस्त शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगर अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सचिव दशरथ महाजन, उपाध्यक्ष निबां माळी, कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी, सहसचिव ठिगंबर माळी, विजय महाजन, सुकदेव अण्णा, शिवसेना शहर अध्यक्ष राजेंद्र महाजन, विलास महाजन, राजेंद्र ठाकरे, माजी उपनगर अध्यक्ष वासुदेव चौधरी, मोहन पाटील, राहुल रोकडे, रवीद्र जाधव, रवीद्र कंखरे, कांतीलाल महाजन, विलास पवार, कमलेश बोरसे, बुट्ट् पाटील, बाळू जाधव, भुरा लोहार, पत्रकार सतीश बोरसे, किशोर पाटील, सचिन सोनवणे आदी उपस्थितीत होते.