TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

चाकूने वार करीत केले गंभीर जखमी; गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
June 24, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – बालपणाच्या मित्रांसोबत गप्पा मारत असतांना जून्या वादातून रिक्षातून आलेल्या दोघांनी तरुणासोबत वाद घातला. त्यानंतर राहूल खिवलानी याच्यावर धारदार चाकूने छातीवर वार करीत जीवेठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना दि. २२ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील बाबा नगरच्या कंपाऊंटमध्ये घडली. हल्ला केल्यानंतर संशयित दोघ तेथून पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिंधी कॉलनीतील बाबा नगरात राहुल जयकुमार खिवलानी हा तरुण राहत असून त्याचा बालपणाचा मित्र भारत कुकरेजा, हर्षल वाधवा आणि पियुष बालानी हे चौघे दि. २२ जून रोजी रात्रीच्या सुमारास बाबा नगरच्या कंपाऊंटमध्ये गप्पा मारीत बसले होते. दरम्यान, थोड्या वेळाने महामार्गावरील झुडीओच्या समोरील रस्त्यावर एक रिक्षा थांबली आणि त्यातून सुनिल तडवी आणि सतराज गायकवाड हे दोघ खाली उतरुन गप्पा मारीत असलेल्या तरुणांजवळ येवून थांबले. यावेळी सुनिल तडवी याने राहुलला शिवीगाळ करीत दमदाटी केली.

हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करत केले रुग्णालयात दाखल

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

राहुलवर अचानक प्राणघातक हल्ला झाल्यामुळे तो रक्ताबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला. दरम्यान, राहुलच्या मित्रांनी त्याला दोघ हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवून दुचाकीवरुन तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. तो पर्यंत हल्लेखोर जून्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच त्याच्या नातेवाईकांसह मित्रांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. परंतू जखमी बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्याचा मित्र भारत कुकरेजा याने रात्री एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुनिल नियामत तडवी व त्याचा मित्र सतराज गायकवाड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तूझे जिन्दा नही छोडूंगा’ म्हणत केले वार

दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाल्यानंतर सुनिल तडवी याने क्या रे तू इतना बडा दादा हो गया क्या, असे म्हणत त्याने राहुलच्या कानशिलात लगावली. राहुल खिवलानी याने प्रतिकार केल्यानंतर सतराज गायकवाड याने राहुल याला पकडून ठेवले तर सुनिल याने आज तुझे जिन्दा नही छोडूंगा असे म्हणत कमरेला खोचलेला चाकू काढून त्याने राहुलच्या छातीवर वार केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJuna issue: Young people chatting with friends commit deadly attack

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
Next Post

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव भाजप कार्यालयाच्या आवारात जाळपोळ ; संशयित मनोरुग्णाला अटक

November 8, 2020

फडणवीसजी, जास्त बोलाल तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, भाजप नेत्याचा घरचा आहेर !

December 24, 2022

विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ ; पतीसह तिघांविरुद्ध मनमाड पोलिसात गुन्हा !

May 12, 2023

महाराष्ट्रातल्या जनतेने संधी दिली म्हणून इथपर्यंत येता आले : शरद पवार

December 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group