धरणगाव (प्रतिनिधी) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्त साधून धरणगाव तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्यावतीने प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार कोविड १९ च्या भीषण काळात राज्यावर असलेल्या रक्तसंकटात मदत म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले आहे.
तरी शहरात रविवारी दि. १८ एप्रिल २०२१ रोजी इंदिरा गांधी विद्यालयात सकाळी ९ वाजेपासून दुपारी १२:३० वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कोरोनाच्या भीषण काळात राज्यात रक्ताच्या तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात चार पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. म्हणून धरणगाव तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्यावतीने आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास यावे व राज्यावर आलेल्या रक्तसंकट दूर करण्यास राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डी. जी. पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सम्राट परिहार, धरणगाव तालुका काँग्रेस रतिलाल चौधरी, धरणगाव शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र न्हायदे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव चव्हाण यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.