पातोंडा (प्रतिनिधी) ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याने सदस्याचा सत्कार पातोंडा पिक संरक्षण सहकारी सोसायटी चेअरमन व जेष्ठ पत्रकार शिवाजीराव पुंडलिक पवार यांनी सदस्य कल्पना सुनिलराव पवार यांचा सत्कार केला. यावेळी शिवाजीराव पवार यांनी माजी सरपंच व विकास सोसायटी माजी चेअरमन सुनिलराव गुलाबराव पवार यांचे कौतुक केले.
वार्ड क्रमांक तीन मध्ये माजी सरपंच शितल पवार यांनी माजी सरपंच सुनिलराव पवार यांच्या मार्गदर्शनाने वार्ड क्रमांक तीन मध्ये रोड़ कॉक्रेट करण व धापे आरो पाणी पिलटर प्लांट भारत निर्माण योजना पाणी पुरवठा २४ तास लाईट सुरु करण्यासाठी प्रयत्न असे कामे करून कामाची आठवण करून दिली. तसेच पातोंडा विकास सोसायटीमध्ये चेअरमन असतांना शेतकऱ्यांसाठी खत उपलब्ध करून दिले होते. कारण विकास सोसायटी मार्फ़त खत आणून देणे काम तितके सोपे नाही. त्यांनी ज्या ज्या वेळेस पद भोगले आहे. त्यां पदाला उपयोग लोक कल्याण कारी उपयोगी कामे करुन घेतले आहे. नुकतेच राजकारणामध्ये इच्छा आहे, म्हणून किवा स्वप्न आहे, म्हणून पद घेवू नका विकास कामे करूनच दाखवू अशी जिद्घ ठेवा असे यावेळेस बोलून दाखवले. निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य वैशाली प्रशांत पवार, सदस्य व माजी उपसरपंच संदीपराव पवार यांचा सत्कार केला. यावेळी पिक संरक्षण सहकारी सोसायटी सदस्य विनोद पवार, मंगेश पवार, महेश पवार, दिनेश पवार, स्वपनिल पवार, शिक्षक अमित पवार उपस्थित होते.