नाशिक (प्रतिनिधी ) येथे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण सम्राट व ईकरा कॉलेज चेअरमन करीम सालार यांनी कोरोना काळात आपल्या कॉलेजमध्ये कोविड सेंटर चालू करून लाखो लोकांचे जीव वाचविले. त्याबद्दल त्यांचा सत्कार ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑगनैजर ट्रस्टतर्फे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. अन्सार सय्येद, नाशिक शहर अध्यक्ष फारूक हुसैन यांचे हस्ते करण्यात आला.
त्यावेळेस जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील अॅड. अकिल इस्माईल, अॅड. रहीम पिंजारी व प्रमुख पाहुणे म्हणून मा.सरकारी वकील सैयद, आमचे मार्गदर्शक खलील पटेल, सलीम वकील, अॅड. ओसामा, अॅड. रेहान सैयद अॅड. परवेज सय्येद, अॅड. संतोष भालेराव व इतर उपस्थित होते.