TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केशवस्मृती प्रतिष्ठान सामाजिक कार्याचे अधिष्ठान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

मातोश्री आनंदाश्रम नवरचनेचा व गौराई आरोग्य उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) डॉ. अविनाश आचार्य आणि संघाच्या प्रेरणेने केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकल्प उभे झालेत. गरीब लोक येत नाहीत, मात्र मध्यम वर्गातील लोक वृद्धाश्रमात येतात. मुलगा, सून, आई – वडिलांना वागवत नाही. मुलांकडील पैसे, वैभव काय कामाचे, असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. ते रविवारी मातोश्री आनंदाश्रम नवरचनेचा व गौराई आरोग्य उपचार केंद्र लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. तर समाजाप्रती असलेल्या समर्पित भावनेतून या आनंदाश्रमाचे केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यवस्थापन होत असून सुसज्ज व्यवस्था असलेला हा आनंदाश्रम ‘प्रेम आणि बंधूभाव’ या भक्कम पायावर. उभा राहीला आहे, अशोक भाऊ जैन यांच्या नवरचनेच्या ध्यासातून मातोश्री आनंदाश्रमाला एक नवीन रूप प्राप्त झाले. जनसेवेचे व्रत घेतलेल्या केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वृद्धाश्रमाचे आनंदाश्रम झाले. केशवस्मृती प्रतिष्ठान माझ्या मतदार संघात असल्याचा मला सार्थ अभिमान असून त्यामुळे येथे आल्यावर ‘समाज आपला व आपण समाजाचे’ याची खऱ्या अर्थाने जाणीव होते. केशव स्मृती प्रतिष्ठान हे सामाजिक कार्याचे अधिष्ठान ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.*

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदाश्रमाच्या प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया यांनी केले. सूसंचालन संध्या कांकरिया यांनी तर आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, दलूभाऊ जैन, जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरत अमळकर, मातोश्री आनंदाश्रमाच्या प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया यांच्यासह केशवस्मृती सेवासंस्थाचे पदाधीकारीव सदस्य उपस्थित होते.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

‘केशवस्मृती’ वर्षांनुवर्ष निरंतर सुरू !
ना. गिरीष महाजन पुढे म्हणाले की, मूकबधिर, गतीमंद मुलांचा सांभाळ करून त्यांना शिकवणे, वाढीस लावणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. ‌‘केशवस्मृती’ वर्षांनुवर्ष निरंतर सुरू आहे. उपेक्षित आणि गरजू घटकांना आधार देणे अशा लोकाभिमुख उपक्रमांचाही केशवस्मृती विस्तार करताना दिसत आहे. अशा कामांसाठी आपल्या उत्पन्नातील काही वाटा खर्च करावा, यापेक्षा मोठे समाधान नाही.

!वृद्धांना दिली जाणारी सेवा कौतुकास्पद !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, कोरोना काळात मदत करण्याची इच्छा असूनदेखील मदत करता येत नव्हती. त्याकाळी जैन परिवाराने पाच हजार लोकांना जेवण देण्याचे कार्य केले आहे. मुलांनी नाकारलेल्या आई वडिलांना समावून घेण्याचे काम मातोश्री आनंदाश्रम करत आहे. हे रोपटे कै. डॉ. अविनाश आचार्य यांनी लावले, याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले. वृद्धाश्रमात अतिशय चांगल्याप्रकारे वृद्धांना सेवा मिळत असून कौतुकास्पद आहे. त्यांच्या निवासाची उत्तम सोय केली आहे हे केशव स्मृती प्रतिष्ठानाचे मोठे समाज कार्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

आनंदाश्रमाचे 75 टक्के काम पूर्ण !
अशोक जैन म्हणाले की, आनंदाश्रमाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. 25 टक्के काम महिनाभरात पूर्ण होईल. या ठिकाणी 100 आजी-आजोबा राहतील. त्यांचे जीवन या ठिकाणी सुखी व समाधानी राहील, अशी व्यवस्था व रचना आहे. मोठ्या भाऊंच्या शिकवणीतून जैन समूह सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी पुढाकार घेता राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आम्ही दहाजण मिळून डॉ. आचार्य !
भरत अमळकर म्हणाले की, आचार्य दादांनी काम करताना माणसांची टीम उभी केली होती. डॉ. आचार्य आज आपल्यात नाहीत, पण आम्ही दहाजण मिळून नक्की डॉ. आचार्य आहोत. समूहाच्या हातून दादांचे नाव खाली जाईल, अशी कृती झाली नाही आणि होणार नाही, सेवेतील ही माणसे दीपस्तंभासारखे आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

नोकरीच्या पहिल्या दिवशीच कापली गेली तरुणाच्या आयुष्याची दोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोळसा टंचाईवर तातडीने उपाययोजना करा ; उर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांचे निर्देश

September 21, 2021

चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

August 17, 2021

बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

January 6, 2025

जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने करत पत्नीचा केला खून !

June 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group