जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी 2023 मध्ये राष्ट्रवादी प्रवेश करताना आपल्याकडे भाजपचे नेत्यांची सीडी असल्याची जाहीर वाच्यता केली होती. मात्र त्यांचा सीडी केलेला आरोप हा फुसका बार ठरला आहे, व त्यांची ती सीडी ही करप्ट झाली की काय आता असेच म्हणावे लागणार आहे. त्याबाबत त्यांनीच स्वतःच आज कबुली दिली आहे. सीडी आपल्याला लोढा देणार होता असे ते म्हणाले. म्हणजे त्यांच्याकडे सीडी नव्हती व सीडी नाही आता हे स्पष्ट झाले आहे. मात्र सीडींच्या नावे बोंब उठून स्वतःच्या प्रतिमा व विश्वासार्हतेवरच आता प्रश्न निर्माण झाले आहे.
भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन या सीडी बाबत एकनाथ खडसे यांना जाहीर आव्हान दिले होते. व अनेक प्रश्न उपस्थित करून समोरासमोर येण्याचे देखील आव्हान दिले होते. मात्र, खडसे यांनी आव्हान न स्वीकारता शरणागती पत्करली असे दिसून येत आहे.
पत्रकारांनी सीडी बाबत विचारणा केली असता ती सीडी लोढा आपल्याला देणार होता असे यावेळी स्वतः कबुली देऊन ती सीडी नसल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी केला आहे. म्हणजेच एकनाथ खडसे यांच्याकडे अशी कोणतीही सीडी नसल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे ,त्यामुळे त्यांचा सीडीचा बॉम्ब हा फुसका ठरला आहे. आता हेही स्पष्ट झाले आहे.त्यामुळे नुसता आरोप करून चर्चा घडवून आणायचे असेच असाच उद्देश खडसे यांचा होता की काय असे या निमित्ताने आता विचारले जाऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळी मोठ्या भीमगर्जनेमध्ये त्यांनी माझ्यामागे ईडी लावल तर मी सीडी लावेल असे म्हटले होते मात्र आता त्यांचा हा सीडीचा बॉम्ब फुसका ठरला असून सीडी करप्ट झाली आहे असेच आता म्हणावे लागेल.
ज्यावेळेस संपूर्ण राज्यात बरीच चर्चा यावर झाली होती नेमकी कोणत्या नेत्याची सिडी आहे याबाबत ही राज्यात उत्सुकता होती. मात्र आता स्वतः खडसेंनीच याबाबत जाहीर वाच्यता केल्याने त्यांच्या आरोपांवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे..