धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वंजारी येथील नाना रघुनाथ माळी (वय ५०) यांचे आज कोरोना या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, नातवंडे, मुली असा परिवार आहे. आपल्या विविध कलागुणांनी नाना माळी यांनी १९९५ पासून आजपर्यंत अहिराणी नाटकांमधून काम केले आहे.
आजपर्यंत त्यांनी आपली नाळ नावाजलेले अहिराणी नाटके गाणे अशा अनेक कलागुणांनी आपली भाषा जोपासली आहे. आजही यूट्यूब चैनल वर खानदेशी राजा या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी भाषेचे जतन संवर्धन करण्याचे काम केलेले आहे. या अहिराणी कलावंताने अचानक जाण्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.