धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा परिषदेचे ७७ गटासाठी आरक्षण सोडत जाहीर सुरु झाली आहे. तत्पूर्वी सकाळी पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. थोड्याच वेळापूर्वी धरणगाव तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांचे आरक्षण घोषित झाले आहे.
धरणगाव तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांचे आरक्षण घोषित झाले आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने इच्छुकांच्या प्रचाराला वेग येणार आहे. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यात प्रमुख लढत बघावयास मिळण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊया…धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय आरक्षण !
पाळधी- बांभोरी प्रचा : जनरल
पिंप्री-वराड : जनरल महिला
नांदेड-चांदसर : जनरल महिला
साळवा-बांभोरी : एस्सी जनरल