मुंबई (वृत्तसंस्था) नवाब मलिक यांनी जे आरोप गेल्या काही दिवसांपासून कऱण्यास सुरूवात केली आहे, त्याबाबत समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे हे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ पार्टी प्रकरण समोर आल्यापासून आणि आर्यन खानला अटक केल्यापासून ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे असा आरोप केला आहे. तसंच समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत असंही त्यांनी वारंवार सांगितलं २००७ मध्ये त्यांनी एका मुस्लिम मुलीशी विवाह केला होता. नंतर त्यांनी तलाक घेतला. तसंच त्यांनी समीर वानखेडे यांचा उल्लेख समीर दाऊद वानखेडे असाच केला होता. यानंतर पत्रकार परिषद घेऊन क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडले होते. आता आज याच प्रकरणी क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत.