पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे नाशिक, धुळे, सुरत व अकोला, शेगांव, नागपुरकडे जाणार्या लाब पल्यांच्या बसेस पाळधी येथील बायपासच्या पुढे दोन्ही बाजुला थांबा मिळण्याची मागणी रा.काॅ.पार्टी.सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी अशोकभाऊ लाडवंजारी, अशोक आप्पा सोनवणे, सुनिलभाऊ माळी यांनी भेट घेऊन दिली. यावेळी जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी तात्काळ प्रश्न मार्गी लावण्यांचे आश्वासन दिले.