धरणगाव (प्रतिनिधी) तालुका भाजपच्यावतीने भाजपाचे जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री यांचा स्मृतिदिनानिमित्त शहर भाजपाचा कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ भाजपाचे कार्यकर्ते व माजी शहर अध्यक्ष कडू महाजन, भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, तालुकाउपाध्यक्ष पुनीलाल आप्पा महाजन, प्रकाश सोनवणे, ता. सरचिटणीस सुनील पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद अण्णा धनगर, सुनील चौधरी, राजू महाजन, शरद भोई, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, सुधाकर साळुंखे, हितेश पटेल, आनंद वाजपेयी, विक्की महाजन, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.