TheClearNews.Com
Tuesday, June 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…रेशनकार्ड मिळवायचे कसे?, रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?

रेशनिंग संदर्भातील नियमांची माहिती करून घेण्यासाठी ही बातमी अवश्य वाचा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) रेशनकार्ड मिळवायचे कसे?, नवीन रेशनकार्ड कोणाला मिळते आणि कागदपत्रे काय लागतील तसेच जर तुमचा रेशन कार्ड नंबर तुम्हाला माहिती नाही? तुम्हाला रेशन वेळेवर मिळत नाही? किंवा तुमची फसवणूक होतेय असे वाटत आहे. ऑनलाईन रेशनिंग नंबर कसा पाहायचा? तसेच रेशनिंग संदर्भातील नियमांची माहिती करून घेण्यासाठी ही बातमी अवश्य वाचा !

रेशनकार्डचे प्रकार

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

अंत्योदय रेशनकार्ड – अंत्योदय योजनेतील लाभधारक
प्राधान्य गट रेशनकार्ड – वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले
केशरी रेशनकार्ड – १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक
पांढरे रेशनकार्ड – १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती

नवीन रेशनकार्ड कधी मिळते?

रेशनकार्ड हरवले असेल तर
दुबार रेशन कार्ड काढावयाचे असल्यास
रेशनकार्ड खराब झाले असेल तर
कुटुंब विभक्त झाले असेल तर
रेशनकार्डामध्ये नाव वाढवायचे असेल तर
रेशनकार्डमधून नाव कमी करणे
व्यक्ती स्थलांतरित झाली असल्यास

आवश्यक कागदपत्रे

तलाठी रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला
लाइट बिल, घरफाळा पावती
घरमालकाचे संमतीपत्र
१० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प
प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीट)
धान्य दुकानदाराचे पत्र
आधार कार्ड झेरॉक्स
बँक पासबुक झेरॉक्स व महिलेचे दोन फोटो

नवीन रेशनकार्ड कोणाला मिळते आणि कागदपत्रे

बाहेरगावाहून आलेले असल्यास : बाहेरगावाहून आलेले असल्यास त्याठिकाणच्या संबंक्षित सक्षम अधिकाऱ्याचा (तहसिलदार) स्थलांतराचा दाखला, रेशनकार्ड मूळप्रत.

ज्यांचे रेशनकार्ड कोठेच नाही : रेशनकार्डमध्ये कोठेच नाव नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, तलाठ्याचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाइटबिल, भाडेकरू असल्यास घरमालकाचे संमतीपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक व ज्या महिलेच्या नावाने कार्ड काढावयाचे आहे त्यांचे दोन फोटो.

विभक्त कुटुंब असेल तर : वरील कागदपत्रांशिवाय विभक्त राहत असल्याचा सरकारी पुरावा उदा. लाइटबिल, घरफळा पावती, ग्रामपंचायत असेसमेंट उतारा यापैकी एक पुरावा. विभक्त राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र वडिलांनी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीने लिहून दिलेले असावे.

रेशनकार्ड हरविले असल्यास : पोलिस स्टेशनचा कार्ड हरविल्याचा दाखला आणि वरील सर्व कागदपत्रे

दुबार रेशन कार्ड काढावयाचे असल्यास : रेशनकार्ड हरविले किंवा खराब झाल्यास दुबार रेशनकार्ड काढता येते. हरविले असल्यास पोलिसांचा दाखला तर खराब झाले असल्यास मूळ रेशनकार्डची प्रत अर्जासोबत जोडावी लागते.

नाव वाढवायचे असल्यास : मूळ रेशनकार्ड, नाव कमी करून आणल्याचा संबंधित अधिकाऱ्याचा दाखला, लग्नामुळे नाव वाढवायचे असेल तर लग्नपत्रिका किंवा यादी पुरावा, विवाह नोंदणी दाखला. लहान मुलगा असेल तर सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी जन्मदाखला तर सहा वर्षावरील मुलांसाठी जन्मदाखला, शाळेचा दाखला आणि प्रतिज्ञापत्र

नाव कमी करणे : मयत दाखला किंवा लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका किंवा यादी.

स्थलांतरीत होऊन आले असल्यास : ज्या कारणाने स्थलांतर झाले आहे त्याचे सक्षम अधिकाऱ्याचा दाखला. रेशनविभागाकडून तपासणी, चौकशी आणि त्यानंतरच कार्ड मिळते.

रेशनकार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही. तर गावागावांत असलेल्या किंवा सर्कलमध्ये असलेल्या महा इ सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. त्याठिकाणी जाऊन वरील कागदपत्रे सादर केल्यास नवीन रेशनकार्ड किंवा नाव कमी करणे आणि वाढवून मिळण्याचे काम होऊ शकते. त्याठिकाणाहून तहसिल कार्यालयात रेशनकार्ड येते आणि त्याची तपासणी करून त्यावर संबंधितांची सही झाली की रेशनकार्ड तयार होते.

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन सेवा या रकान्यात सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील मराठी या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला मराठीत माहिती दिसून येईल.

त्यानंतर वरच्या बाजूच्या साईन इन किंवा रेजिस्टर या रकान्यातील ऑफिस लॉग इन किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्यायांपैकी तुम्हाला सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत. इथं तुम्ही भाषा इंग्लिश ठेवू शकता किंवा लोकल लँग्वेज या पर्यायावर क्लिक करून मराठीत पुढे चालू ठेऊ शकता.

त्यानंतर खाली तुम्हाला दोन पर्याय असतील, एक म्हणजे नोंदणीकृत युझर आणि दुसरा नवीन युझर. तर आपण पहिल्यांदाच या साईटवर येत असल्यानं आपल्याला नवीन युझर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं Do you have ration card आणि No ration card असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. यातल्या No ration card या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

इथं सुरुवातीला तुम्हाला तुमचं स्थानिक भाषेतलं नाव, ते तुम्ही मराठीत लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालेल. त्यानंतर आधारवर जे नाव आहे आणि ते जसं आहे तसंच लिहायचं आहे. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुढे मेल आयडी असेल तर तो लिहायचा आहे, त्यानंतर आधार कार्डवरील जन्मतारीख टाकायची आहे. नंतर लिंग निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. ही माहिती भरून झाली की Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जर मोबाईल वर हे पाहत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यात वरती लाल अक्षरात एक मेसेज दिसेल. पण जर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा पीसीवरती हे पाहत असाल तर Verify Aadhar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन झूमचं प्रमाण १०० किंवा त्याहून कमी टक्क्यांवर आणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लाल अक्षरातला मेसेज स्पष्टपणे दिसेल.

Aadhar card Already exist for another RC. Details are as follows-District Name: ‘Buldana’, Village Name: ‘Shirpur’, RC ID: ” and MEMBERID: ’01’ असा हा मेसेज असेल. याचा अर्थ तुमचं आधार कार्ड रेशन कार्डला ऑलरेडी लिंक केलेलं आहे. पुढे तुमचा जिल्हा, गावाचं नाव आणि आरसी आयडी म्हणजे बारा अंकी रेशन कार्ड नंबर दिलेला असेल.

रेशन कार्ड ऑनलाईन कसं पाहायचं?

आता एकदा का तुम्हाला तुमचा आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचं रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता आपण ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकला की समोरील view report वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल.

स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की, सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे. यावर क्लिक केलं की तुमचं रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर-नाव-पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसंच तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतं आणि ते किती मिळायला हवं, याची माहिती दिलेली असते.

आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे रेशन कार्ड तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा इतर कामासाठी वापरू शकत नाही. तशी स्पष्ट सूचनाच इथं दिलेली आहे. ही सुविधा तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन बघता यावं, केवळ यासाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
Next Post

जळगावच्या साहित्यिक डॉ. प्रियंका सोनी "प्रीत'' राष्ट्रीय साहित्य सौरभ पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर व्याख्यानं देणं म्हणजे बांडगुळानं झाडाचं रक्त शोषणं” : राज ठाकरे

August 21, 2021

अनुयायांना चैत्यभूमीवर प्रवेश नाही, महापरिनिर्वाण दिनाचं थेट प्रक्षेपण होणार : धनंजय मुंडे

November 18, 2020

‘द क्लिअर न्यूज’ इफेक्ट : बातमी प्रकाशित होताच अवैध बायोडिझेलची विक्री बंद !

July 25, 2022

‘लव्ह जिहाद’ : राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवू नका, सेनेचा भाजपला इशारा

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group