मुंबई (वृत्तसंस्था) बेशिस्तपणे वाहन चालवणे तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणे आता चांगलेच महाग पडणार आहे. कारण की सुधारित मोटार वाहन कायदा प्रमाणे दंडाची आकारणी आता वाढून दुप्पट ते चोपट करण्यात आली आहे. विनालायसेन्स वाहन चालविणाऱ्यांना आता एक दोन नाहीतर थेट 5 हजार रूपयांची दंडाची पावती फाडली जाणार आहे.
तसेच दंड न भरल्यास न्यायालयीन खटलेही दाखल होणार आहेत. शहर वाहतूक शाखेनेही या दंडाची अंमलबजावणी आता सुरू केली आहे. शहरातील सेफसिटी कॅमेर्यांमध्ये वाहतूक नियम मोडणार्यांचे फोटो घेतले जातात. मोबाईलवर बोलणारे, एकेरी मार्गाचे उल्लंघन, ट्रिपल सीट, सिग्नल जंप असे प्रकार यामध्ये फोटोसह येत असल्याने वाहनधारक याला नकारच देऊ शकत नाहीत. राज्यभरात ई-चलन प्रणाली २०१९ पासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दंडाची रक्कम भरण्यास पैसे नसल्यास तो दंड अनपेड म्हणून संबंधित वाहनधारकाच्या नावावर थकीत राहतो. तीन वर्षांत अशा दंडाची रक्कम तब्बल १० कोटींच्या घरात गेली आहे.
नियमांचे उल्लंघन जुना दंड सुधारित दंड
लायसेन्स नसताना वाहन चालविणे 500 5,000
सीटबेल्टचा वापर न करणे 200 500
ट्रिपल सीट 200 1,000
चुकीच्या दिशेने वाहन चालविणे 1,000 न्यायालयात खटला
कर्कश व्हॉर्नचा वापर 200 1,000
पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणे 200 500
काचेवर फिल्मिंग 200 500
मद्य प्राशन करून वाहन चालविणे न्यायालयात खटला
वेगमर्यादेचे उल्लंघन 1,000 2,000
लायसेन्स जवळ न बाळगणे 200 500
विम्याशिवाय वाहन चालविणे 2,000 2,000
नो पार्किंग 200 न्यायालयात खटला
खराब नंबर प्लेट 200 500
सिग्नल तोडणे 200 500
वाहनात मोठ्या आवाजात स्पीकर लावणे 200 500