जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अजिंठा चौकात रात्री भरधाव ट्रकने एकाला चिरडल्याची घटना ताजी असताना अवघ्या १२ तासात दुसऱ्या घटनेत भरधाव आयशरने त्याच ठिकाणी एका पायी जाणाऱ्या तरुणाला उडविल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. अजय सिताराम कोळी, असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान बेशिस्त वाहतुकीमुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
जळगाव शहरातील अजिंठा चौकात बुधवारी १८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास एका भरदाव ट्रकने चिरल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आज पुन्हा अजिंठा चौकात इच्छादेवी चौकाकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने होडा शोरूमसमोर उभा असलेल्या अजय कोळी या तरूणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.