जळगाव (प्रतिनिधी) मोहम्मद ताहेर पटनी उर्दू हायस्कूल पाळधी येथे गांधी जयंतीनिमित्त “गांधी जी आणि उर्दू” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन मुख्याध्यापक मुश्ताक करिमी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरान पठणाने गुलनाज़ पटेल यानी केली. प्रस्तावना शाह सईद यांनी केली. व्याख्यानात रूबीना रसूल खान यांनी सांगितले की, उर्दू भाषेवर गांधीजींचे मोठे प्रेम होते. त्यानी उर्दू भाषेत पत्र लिहले आणि देशाला स्वतंत्रता मिळवून देण्यासाठी हरीजन सेवक नामक उर्दू वृतपत्रही सूरू केले होते. या वेळी प्रमुख अतिथि वसीम शेख, नईम बिस्मिल्ला व शाह सईद यांनीही गांधीजी यांचे कार्य व बलिदानावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात मुश्ताक करिमी यांनी सांगितले की, आज गांधीजी यांचे आचार व विचारांवर चालण्याची मोठी गरज भासत आहे. यावेळी लाल बहादुर शास्त्री यांच्या कार्यांचाही गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन समरीन कलीम यनीं तर आभार प्रदर्शन अकील अजीज यांनी केले.