TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोरांच्या रूपाने असलेली ओळख मेहरुणला पुन्हा मिळवून देऊ : महापौर जयश्री महाजन

‘मराठी प्रतिष्ठान’च्या फळबागेसह रानमेवा प्रकल्पाचा शुभारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चवीला अतिशय गोड अन् रुचकर म्हणून मेहरुणच्या बोरांची सर्वदूर असलेली ओळख दिवसागणिक लोप पावत चालली आहे. ती पुनश्च मिळवून देण्यासाठी मी जळगाव शहरातील प्रथम नागरिक अर्थात महापौर या नात्याने ‘मराठी प्रतिष्ठान’च्या फळबाग व रानमेवा प्रकल्पाच्या आयोजनाचे मनापासून स्वागत करते. अतिशय स्तुत्य हा उपक्रम आहे. मी मेहरुण निवासी असल्याने बोरांच्या रोपांची लागवड व संगोपनाची जबाबदारी यानिमित्ताने स्वीकारते. या प्रकल्पात परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी केले.

येथील ‘मराठी प्रतिष्ठान’तर्फे संपूर्ण जळगावकरांंकरिता शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या काठावर साकारल्या जात असलेल्या फळबाग व रानमेवा प्रकल्पाचा शुभारंभ आज रविवार, दि. ४ जुलै २०२१ रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रकल्पांतर्गत मेहरुण परिसरात ५०० फळझाडे व रानमेवा रोपांची लागवड केली जाणार आहे.

READ ALSO

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

माजी आमदार मनीष जैन, जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, विनोद चौधरी, पारस टाटिया, बंटी बुटवानी, नरेश चौधरी, विश्वासराव मोरे, डॉ. बेंद्रे, आनंद मराठे, दाणा बाजार असोसिएशनचे पदाधिकारी, संतोष क्षीरसागर, भास्कर काळे, प्रकल्पप्रमुख विजयकुमार वाणी, ‘मराठी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे, सतीश रावेरकर, अनुराधा रावेरकर, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, विद्या चौधरी, प्रा.सविता नंदनवार यांच्यासह जळगाव शहरातील असंख्य पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. याप्रसंगी मनीष जैन व अनिकेत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रकल्पप्रमुख विजयकुमार वाणी म्हणाले, की संपूर्ण जळगावकरांंकरिता शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या काठावर येथील ‘मराठी प्रतिष्ठान’तर्फे फळबाग व रानमेवा प्रकल्प साकारला जात आहे. प्रकल्पांतर्गत या परिसरात ५०० फळझाडे व रानमेवा रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी गेल्या शुक्रवारी, दि. २ जुलै २०२१ रोजी सकाळी प्रकल्प परिसराला जिल्हाधिकारी अभिजित राऊत व महापौर जयश्री सुनिल महाजन, आमच्या ‘मराठी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, अनुराधा रावेरकर, प्रा.सविता नंदनवार, पिरजादे, मतीन पटेल, प्रतिष्ठानचे स्वयंसेवक सहकारी बंधू-भगिनी व पर्यावरणप्रेमींनी पाहणी केली होती. या प्रकल्पांतर्गत सीताफळ, रामफळ, जगप्रसिद्ध मेहरुणची बोरे तसेच महाबळेश्वरची मलबेरी (सैतू), नाशिकचे करवंद व बर्‍हाणपूरची गोड खिरणी अशा रानमेव्याची लागवड केली जाईल. सदरचा प्रकल्प हा लोकसहभागातून साकारला जात असून, पाच वर्षे या रोपांची जोपासना ‘मराठी प्रतिष्ठान’ करेल. साधारणपणे दुसर्‍या वर्षापासून काही झाडांना फळधारणा होईल व उर्वरित झाडांना तिसर्‍या, चौथ्या व पाचव्या वर्षापासून फळधारणा होईल. ही सर्व रोपे जैन नर्सरीतून आणली असून, ती दीड फूट उंचीची व एक वर्ष वयाची आहेत. त्यांच्या लागवडीसाठी पाचशे खड्डे खोदले जाऊन त्यात कीटकनाशक, जैविकखत टाकले गेल्यानंतर रोपांची लागवड होईल. संगोपनासाठीही यंत्रणा असणार असून, रोपांना टँकरद्वारे पाणी दिले जाईल. त्यानंतर जळगाव शहरातील नागरिकांना या फळांचा व रानमेव्याचा आस्वाद घेता येईल. नागरिकांनी एकदा या प्रकल्पाला अवश्य भेट द्यावी. तसेच सदर प्रकल्पात वृक्ष दत्तक योजनाही असून, नागरिकांना यात सहभाग नोंदविता येईल. त्यासाठी ‘मराठी प्रतिष्ठान’शी संपर्क साधावा.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
Next Post

... अशी भीती असणाऱ्यांना मी माझे उदाहरण देतो : विनोद देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १३ मे २०२३ !

May 13, 2023

NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी सुरू ; ‘हे’ कागदपत्रे असणे आवश्यक !

December 31, 2021

एका ब्रेन डेड रुग्णांमुळे ७ अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात : डॉ. रोहन पाटील

October 1, 2024

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

December 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group