धरणगाव प्रतिनिधी । लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव या शाळेत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या थोर पुरुष यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव, सदस्य ज्योती जाधव, गजानन ए. के. पाटील या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गजानन साठे यांनी भूषवले.
कार्यक्रमप्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम भाटिया यांनी केले तर गांधीजी विषयी व लालबहादूर शास्त्री या थोर महापुरुषांच्या अनमोल कार्याचे महत्त्व प्रतिभा चौधरी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजू यांनी देखील गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील आपल्या घरी राहून स्वच्छतेचे तसेच वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा वेशभूषा चे व्हिडिओज व फोटो शाळेच्या ग्रुप वर मागवण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन यशस्वी चौधरी यांनी केलेले कार्यक्रम प्रसंगी हेमांगी पटेल प्रमोद पाटील व सर्व शिक्षक वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले व अशा रीतीने शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा थोर महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.