जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यलयीन सचिव संजय चव्हाण यांनी तयार केलेल्या सन २०२४च्या ‘साहेब’ या दिनर्शिकेचे प्रकाशन काल नागूपर येथे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते पार पडले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या कार्यावर आधारीत ‘साहेब’ ही दिनदर्शिका संजय चव्हाण गेल्या २३ वर्षांपासून दरवर्षी प्रकाशीत करीत असतात. आगळ्या वेगळ्या विषयांमुळे राज्यातील राजकीय वर्तूळात नेहमीच या दिनदर्शिकेची चर्चा असते. यंदाच्या दिनदर्शिकेसाठी पवार यांच्या कृषी क्षेत्रातील कार्य हा विषय घेतला आहे. या प्रकाशन समारंभात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत पाटील व दिलीप चव्हाण, कृ.ऊ.बा. समितीचे संचालक सर्वश्री योगराज सपकाळे, डॉ. अरुण पाटील, प्रदेश युवक सरचिटणीस रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
















