चाळीसगाव (प्रतिनिधी) आज ६ जानेवारी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी पत्रकारांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. उदात्त हेतुने महाविकास आघाडीच्या वतीने आघाडीचे नेते माजी आमदार राजीव देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, सुरेश भाऊ स्वार, नानाभाऊ कुमावत, प्रशांतनाना देशमुख, श्याम देशमुख, रोशन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव नगरपालिकेत पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी दैनिक सर्वांचा ग्रामस्थचे संपादक ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव एम. बी. पाटील, दैनिक बाजीरावचे कार्यकारी संपादक सुनील राजपूत, दैनिक लोकमतचे जिजाबराव वाघ, दैनिक देशदूतचे मनोहर कांडेकर, दैनिक सकाळचे आनन शिंपी, दैनिक साईमतचे मुराद पटेल, दिलीप घोरपडे, पुण्यप्रतापचे अजित शेख, निंबा सोनार, दैनिक सामनाचे स्वप्निल वडनेरे हे पत्रकार उपस्थित होते. तर कार्यक्रमास नगरसेवक शेखर देशमुख, रविंद्र चौधरी, सदाशिव गवळी, सूर्यकांत ठाकूर, प्रदीप राजपूत, प्रवीण जाधव, आकाश पोळ, सुनील गायकवाड, सुनील कुडे, वसीम चेअरमन आदी उपस्थित होते.