TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

vijay waghmare by vijay waghmare
July 31, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात शुक्रवारी महावितरणच्या यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी खांब पडून व पुरात रोहित्रे पाण्यात गेल्याने वीजपुरवठा खंडित झाला. मात्र महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर परिश्रम करून वीजपुरवठा पूर्ववत केला. गांधली उपकेंद्रात पाणी शिरल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला.
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यावर अनेक खोलगट भागात पुराचे पाणी जमा होऊ लागले. परिणामी महावितरणकडून अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करण्यात आला. वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने काही ठिकाणी तारा तुटल्या आणि खांब वाकले. यामुळे धरणगाव विभागांतर्गत वरडी, मंगरूळ, गांधली, भरवस, जानवा, वावदे, पाचोरा विभागांतर्गत लासगाव, मुक्ताईनगर विभागांतर्गत निमखेडी, तळवेल, हरताळे, चांगदेव, घोडसगाव, रुईखेडा, सावदा विभागांतर्गत मंगरूळ, पाल, जळगाव विभागांतर्गत किनोद व भुसावळ विभागांतर्गत शेंदुर्णी या 17 उपकेंद्रांचा वीजपुरवठा ठप्प झाला.
बिघाडाची माहिती मिळताच महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने हालचाली केल्या, अनेक ठिकाणी विद्युत खांबावरील डिस्क व पिन इन्सुलेटर फुटले होते. हे बिघाड शोधण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी चिखलातून पायपीट करून व उभ्या खांबावर प्रत्येक ठिकाणी चढ-उतर करून, बिघाड शोधून, त्या ठिकाणी नवीन डिस्क व पिन बदलून काम करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. पडलेले खांब व तुटलेल्या तारा जोडण्यात आल्या. तर काही ठिकाणी पूरपस्थितीमुळे कामात अडथळे आले. 17 पैकी 16 उपकेंद्रांचा वीजपुरवठा दुपारपर्यंत सुरळीत करण्यात आला. गांधली 33 केव्ही वाहिनी अंशत: सुरू करण्यात आली. मात्र उपकेंद्राच्या आवारात पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. गांधली गावानजीक पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे एक विद्युत खांब पूर्णपणे पाणीपात्रात कोलमडलेला होता. त्यामुळे उपकेंद्राचा इन्कमर सुरू करण्यात अडचण होती. उपकेंद्रातील पाणीपातळी कमी होताच दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान गलांगी उपकेंद्र येथून पर्यायी वीजपुरवठा घेऊन गांधली उपकेंद्रातील 11 केव्ही वाहिन्या सुरू करण्यात आल्या.
पारोळा तालुक्यात नदीनाल्यांना पूरपरिस्थितीमुळे काही गावात रोहित्रे पाण्यात बुडाल्यामुळे शेळवे, मेहुतेहू, बिचखेडा, उंदीरखेडा, शेवगे, मुंडाणे, तामसवाडी या 11 केव्ही वीजवाहिन्या सुरक्षेसाठी सकाळी बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु पूराचा ओघ जसा जसा कमी होत आहे तसा तसा पेट्रोलिंग करून वाहिन्या चालू करण्यात आल्या. कळमसरे शाखेअंतर्गतही पुराळे निंब, बोहरा, शहापूर या गावठाण वाहिन्यांसह सर्व कृषी वाहिन्या सकाळी बंद होत्या. कळमसरे उपकेंद्राच्या आवारातही पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी 11 केव्ही इनकमर काही वेळ बंद होता.
मुसळधार पाऊस व पूरस्थितीतही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वीजग्राहकांनी संयम बाळून सहकार्य करण्याचे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

 

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMahavisitaran restores power supply disrupted by rain on a war footing.

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! नोकरीच्या नावाखाली शेजारणीने अल्पवयीन मुलीला विकलं ; मुलीवर अनेकवेळा बलात्कार

March 17, 2022

एकाच दिवशी नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थीनींची आत्महत्या ; सुसाईड नोट वाचून पालकांना बसला धक्का !

January 29, 2022

कोविड रूग्ण, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार ऑनलाईन मोफत सल्ला !

October 17, 2020

नवाब मलिक यांना आणखी एक धक्का ; राज्यभरात 9 मालमत्ता ईडीने केल्या जप्त !

April 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group