TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पदाचा मान राखतोय, अन्यथा महाराष्ट्रात शिव्याची कमी नाही ; राज ठाकरेंचा कोश्यारींवर निशाणा !

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कोश्यारीचं वय काय? ते बोलतायेत काय? राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतो. नाहीतर महाराष्ट्रात शिव्याची कमी नाही असं म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

राज ठाकरे हे मुंबई आयोजित मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. राज्यपाल कोश्यांरींच्या वक्तव्यावर बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, कोश्यारी यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना धोतर असं संबोधलं. ते म्हणाले, ‘त्या दिवशी ते आमचं धोतर बोललं नाही का… कोश्यारी. वय काय, बोलतोय काय, काय चाललंय. राज्यपाल पदावर बसला आहेस म्हणून मान राखतोय, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही.’ ते काय बोलून गेले महिन्याभरापूर्वी… म्हणे इथले जर गुजराती आणि मारवाडी जर परत गेले, तर इथे काय होईल. कोश्यारीजी, पहिल्यांदा त्या गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा की, तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात?. तुम्ही उद्योपती आहात ना, तुम्ही व्यापारी आहात ना… मग तुमच्या राज्यात का नाही व्यापार केलात?, का नाही उद्योग थाटलेत? याचं कारण असं की उद्योगधंदे थाटण्यासाठी आणि व्यापर करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रासारखी सुपिक जमीन नव्हती.’

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

महाराष्ट्राचा गौरव करताना राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा… अहो, महाराष्ट्र मोठाच होता हो. मोठाच आहे. हा जेव्हा देश नव्हता तेव्हा या देशाला, या भागाला हिंद प्रांत म्हणत. पर्शिया म्हणजेच नंतरचा इराण, ते लोक या भागाला हिंद प्रांत म्हणत. या हिंद प्रांतावर आजपर्यंत आक्रमणं झाली. त्यात मोगल आले, ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले. मोगल तर किती वर्षे होते, ब्रिटिश तर किती वर्षे होते. पण या हिंद प्रांतावर जर खऱ्या अर्थाने कोणी सव्वाशे वर्षे राज्य केलं असेल तर ते आमच्या मराठेशाहीने केलं. महाराष्ट्र समृद्ध होताच ओ. महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला कोश्यारींकडून नाही ऐकायचे आहे.’

अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हल्ली कोणी काय येतंय काही बरळतंय. राजकीय पक्षाचे जे काही प्रवक्ते बोलत असतात अरे कोणती भाषा. मी असा महाराष्ट्र बघितला नाही. एक मंत्री एका महिलेला भिकारचोट म्हणतो. काय भाषा असते काय बोलत असतात. त्यांना वाटतं विनोद करतो. तू कोण आहेस, आपली लायकी काय आपण काय बोलतो. मला भीती वाटते, आताचे तरुण हे पाहत असतील आणि ते म्हणत असतील असे असते का राजकारण? मग ठीक आहे, जातीपातीचे विष कालवण्यासाठी हे सुरू आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणलाे की, कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले. बाळासाहेब जी भूमिका बोलत होते भोंगे उतरले पाहिजे ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण भोंगे काढा असे नाही म्हणालो, नाही काढले, तर हनुमान चालीसा लावू असे सांगितले. पण अजून काही ठिकाणी चरबी जिरलेली नाही. जिथे जिथे हे सुरु असेल तर पोलिसांना तक्रार दाखल करा. तरी झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा.

राहुल गांधी म्हणजे म्हैसूर सँडल सोप आहे, सावरकरांवर बोलण्याची त्यांची लायकी आहे का? सावरकरांनी काय हाल सहन केले हे त्यांना माहिती आहे का? तो दयेचा अर्ज नव्हता सावरकरांची रणनीती होती, असे म्हणत राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. गुजरातमधून 20 हजार युपीच्या लोकांना लोकेश ठाकूर यांनी हाकलून दिले. मात्र राज ठाकरेंनी जर हे केले तेही महाराष्ट्रांतील तरुणांच्या नाोकरीसाठी हे चुकीचे आहे. भूमिका लोकांपर्यंत पोहचविणारे तुम्ही आहात, तुमच्या मार्फत 16 वर्षांत काय केले, यावर आपण एक पुस्तक काढत आहोत अशी घोषणाही राज ठाकरेंनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २८ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘रामाच्या नावे तुकडे तुकडे गँग…’ ; संजय राऊतांचा ‘रोखठोक’मधून हल्लाबोल

April 17, 2022

चुलत भावांकडून तरुणाचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

October 18, 2023

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२२ प्रभाग गट रचना चौकशीचे आयोगाचे आदेश

January 29, 2022

परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी खोटा आरोप केला – गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group