मुंबई (वृत्तसंस्था) पॅन कार्ड (pan card) अनेक कामांसाठी, महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट मानलं जातं. इनकम टॅक्स रिटर्न करायचं असेल, बँकेत 50000 हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर घरबसल्या पॅन कार्ड फ्रीमध्ये बनवता येणार आहे.
प्राप्तिकर विभागाने ई-फाइलिंग पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरू केली आहे, जी एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकाच्या आधारावर ग्राहकांना पॅन वाटप करते. अटींची पूर्तता केल्यानंतरच या सुविधेचा वापर करू शकता. सदर व्यक्तीला कधीही पॅन मिळालेले असू नये. तसेच मोबाईल क्रमांक त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेला असावा. त्यांची संपूर्ण जन्मतारीख आधार कार्डवर उपलब्ध असावी आणि पॅनसाठी अर्ज करण्याच्या तारखेला सदर व्यक्ती अल्पवयीन नसावा.
झटपट मिळवा पॅन
झटपट पॅन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम www.incometax.gov.in च्या संकेतस्थळावर जा. येथे होम पेजवर दिलेल्या ‘इन्स्टंट ई-पॅन’ पर्यायावर क्लिक करा. ‘गेट न्यू ई-पॅन’ वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक टाका. आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा. आधार तपशील भरा. तुमचा ई-मेल आयडी वैध करा आणि तुमचे ई-पॅन डाउनलोड करा.