बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर बु. येथील शेतकरी वसंत डांगे यांचा तेरा वर्षाचा बैल लम्पी आजाराने मरण पावला आहे.
मागील पंधरा दिवसांपासून वसंत डांगे यांचे बैल बाधित होते. परंतु उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यातील एक बैल मरण पावला. या बैलाचे शवविच्छेदन डॉ रवी गाढे (पशुसंवर्धन अधिकारी, पातोंडा अमळनेर) यांनी केले. त्यानंतर या बैलाच्या मृतदेहास खड्डा करून पूरण्यात आले. तालुक्यातील लसीकरण बहुतांशी पूर्ण झाले असून या कामी खाजगी पशुधन पर्यवेक्षकांची मदत झाली आहे. अजूनही उपचारासाठी शासकीय यंत्रणेस त्यांचे सहकार्य होत आहे. आजपर्यंत तालुक्यात ११२२ जनावरे लंम्पीने बाधित असून ७० जनावरांना मृत्यू झाल्याची माहिती पशुधन विकास अधीकारी डॉ दीपक साखरे यांनी दिली.