धरणगाव(प्रतिनिधी) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र मराठा फाउंडेशनने केले स्वागत आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्वाचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी अधिसंख्य जागा वाढवुन नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. यामुळे मराठा विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय घेतला, त्या निर्णयाची छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज राजे यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अभिनंदन करून या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मराठा समाजासाठी तात्काळ निर्णय घेऊन पावसाळी अधिवेशनमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या निर्णय घेतल्याबद्दल मराठा फाउंडेशन सामाजिक संघटना महाराष्ट्रतर्फे स्वागत केले जात आहे. संस्थापक अध्यक्ष अँड बापूसाहेब विजय जाधव,उपाध्यक्ष पी.एम.पाटील सर, कोर कमिटीचे विजय पोकळे, राज्य सचिव रवींद्र धुमाळ, महाराष्ट्राचे सल्लागार अँड.चंद्रकांत ठोंबरे व महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजातर्फे शिंदे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे .