नशिराबाद (सुनिल महाजन) नशिराबाद येथे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये मराठी गौरव दिवस हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साजरा करण्यात आला.
सर्व ३७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष जमील भाई देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, महानगर अध्यक्ष किरण तळेले, यशराज शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, दशरथ शहर सचिव गोकुळ, धनगर सचिन भालेराव, लक्ष्मण तायडे, समाधान केदार, तेजस कुडी, गजेंद्र माळी, संजय कोळी आधी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.