धरणगाव (प्रतिनिधी) माहेरून ५ लाख रुपये आणले नाही म्हणून विवाहितेस शिवीगाळ करत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शारदा आकाश शिंदे (वय २२, रा. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक रावेर ह.मु. एकलग्न ता.धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ ऑक्टोंबर २०२१ चे दि. १५ मार्च २०२२ रोजी दरम्यान पती आकाश अशोक शिंदे, सासू आशा अशोक शिंदे, ननंद कीर्ती भूषण मराठे, ननंद मयुरी अशोक शिंदे यांनी शारदा शिंदे हिने माहेरून ५ लाख रुपये आणले नाही, या कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुंभ हे करीत आहेत.
















