न्यूज नेटवर्क । बीड (2 जानेवारी 2025) ः शासनाकडून आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली असून ही समिती आता मस्साजोग सरपंच हत्येचा तपास करणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लवकरच तपास लागणार असल्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अटकेतील वाल्मीक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यांचा एसआयटी पथकात समावेश
या प्रकरणाच्या तपासासाठी 10 जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. यात आयपीएस बसवराज तेली, पोलिस उप अधीक्षक अनिल गुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे, पोलिस शिपाई संतोष गित्ते, असे या अधिकार्यांचे नाव आहे.