TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौर जयश्री महाजन पहिल्याच दिवसापासून जनसेवेसाठी तत्पर !

कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेचा घेतला आढावा : जास्तीत जास्त बेड वाढविण्याच्या सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारत प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करणाऱ्या महापौर जयश्री महाजन यांनी लागलीच कामाला सुरुवात केली आहे. महापौरांनी पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला असून जास्तीत जास्त बेड वाढविण्याच्या सूचना केल्या आहे. तसेच लसीकरणाचे केंद्रे देखील लवकरात लवकर वाढविण्याचेही महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात आयोजित बैठकीला उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, सभागृह नेते ललित कोल्हे, रियाज बागवान, प्रशांत नाईक, उपायुक्त कपील पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.संजय पाटील, बाबा साळुंखे, डॉ.विजय घोलप यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

महापौरांनी घेतला आढावा

महापौर जयश्री महाजन यांनी सर्वप्रथम कोरोना रुग्णांसाठी सध्या असलेल्या व्यवस्थेची माहिती आणि सोयसुविधांचा आढावा घेतला. कोविड सेंटर आणि शहर मनपाकडून केल्या जाणाऱ्या उपायांची महापौरांनी माहिती घेतली.

बेडची संख्या जास्तीत जास्त वाढवा

शहर मनपाकडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहासह इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत असून त्यादृष्टीने जास्तीत जास्त बेडची संख्या वाढवावी, शक्य असल्यास आणखी काही कोविड सेंटर सुरू करावे लागले तर तशी तयारी देखील ठेवा, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

जळगाव मनपाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ आणि तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व कोविड सेंटरने आपसात समन्वय ठेवावा. जर आपल्याकडे जागा शिल्लक नसेल तर त्यांना खाजगी मोफत कोविड सेंटरला पाठविण्यात यावे, असेही महापौरांनी सांगितले. नागरिकांची आणि नातेवाईकांची फिराफिर होऊ नये यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करा अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या. जळगाव ग्रामीणचे काही रुग्ण देखील मनपाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत, ग्रामीणच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर असावे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून ते तशी व्यवस्था करणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.

कोविड रुग्ण आणि सामान्य व्यक्तींसाठी स्वतंत्र अंत्यसंस्कार व्यवस्था करावी

जळगावात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी नेरीनाका स्मशानभूमी केवळ कोरोनाने मृत्यू झालेल्यांसाठी राखीव होती. पुन्हा आता तशी परिस्थिती आली असून त्यादृष्टीने व्यवस्था करावी. कोरोनाने मृत्यू होणारे आणि सामान्य व्यक्तींसाठी स्वतंत्र अंत्यसंस्कार व्यवस्था करावी. अंत्यसंस्कारप्रसंगी होणारी गर्दी अद्यापही नियंत्रणात येत नसून त्यासाठी कार्यवाही करावी, असेही महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

अरे बापरे... जिल्ह्यात आज आढळले १०९० कोरोनाबाधित, ९०७ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंडारी येथे युवकाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

September 24, 2020

भाजपला एका शिवसेनेच्या दहा शिवसेना करायचा आहेत : प्रकाश आंबेडकर !

October 6, 2022

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group