TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आत्महत्येची धमकी देणाऱ्या मद्यपीला महापौरांचा दणका !

४ दारूच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या केल्या जप्त : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू, गुटखा न दिल्यास आत्महत्येची धमकी देणाऱ्याला महापौर सौ.भारती सोनवणे यांनी चांगलाच दम दिला. मद्यपीकडून दारूच्या ४ बाटल्या, गुटखा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मद्यपीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत असून महापौर सौ.भारती सोनवणे रुग्णांची विचारपूस करीत असतात. बुधवारी अविनाश पाटील नामक एक मद्यपी गोंधळ घालत असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांना मिळताच त्या तात्काळ त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.विजय घोलप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

महापौरांनी केली कानउघडणी

मनपाच्या कोविड केअर सेंटर इमारत क्रमांक ४ मध्ये आईसह उपचारार्थ दाखल असलेल्या अविनाश पाटील या तरुणाने बाहेरून दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. तसेच मला दारू आणि गुटखा न दिल्यास मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी तो देत होता. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्याला खाली बोलवत चांगलीच कानउघडणी केली. तसेच त्याच्या ताब्यातील ४ दारूच्या बाटल्या आणि गुटखा देखील काढून घेतला.

गुटखा घेऊन पळाला, खोलीला लावली कडी

महापौर सौ.भारती सोनवणे या मद्यपीला खडसावत असतानाही त्याने मद्यप्राशन केलेले होते. महापौरांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्याने टेबलावर ठेवलेली गुटख्याची पुडी उचलून वर पळ काढला आणि स्वतःच्या खोलीत जात आतून कडी लावून घेतली. मद्यपी इतक्यावरच थांबला नाही तर खोलीतून तो पुन्हा पुन्हा आत्महत्येची धमकी देत होता.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या अविनाश अरुण पाटील याच्यासह कोविड केअर सेंटरच्या बाहेर जाऊन परत येणाऱ्या गजानन विजय काकडे, प्रसन्न प्रदीप सराफ यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात डॉ.विजय घोलप यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिले आहे.

मद्यपी रुग्णाची मुजोरी आणि महापौरांचा दणका !

जळगाव शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये महापौर सौ.भारती सोनवणे या पाहणी करण्यासाठी गेल्या असता एक कोरोना रुग्ण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. कोरोना रुग्ण बाहेर जाऊन दारू घेऊन आला असल्याचा प्रकार समोर आल्याने महापौरांनी त्याला चांगलेच खडसावले. महापौरांनी मद्यपीकडून ४ दारूच्या बाटल्या आणि गुटख्याच्या पुड्या जप्त केल्या. मुजोर मद्यपीला जाब विचारत असताना गुटख्याच्या पुड्या घेऊन त्याने खोलीत पळ काढला. संबंधित मद्यपी रुग्णाने खोलीला आतून कडी लावून आत्महत्येची धमकी दिली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्या रुग्णावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
Next Post

मुरघास निर्मितीकरीता अर्थसहाय्य १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरफोडी करून चोरट्याने दागिन्यांसह रोकड लांबविली ; अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

March 26, 2022

२२ वर्षीय तरुणाने ‘या’ कारणातून संपवलं जीवन !

May 3, 2022

खळबळजनक : पुण्यात तरुणाचा अर्धनग्न मृतदेह पोत्यात बांधून टाकला !

September 29, 2020

अजित पवार यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला अन् जळगाव राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी गोची !

July 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group