जळगाव (प्रतिनिधी) जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष सोहेल अमीर यांच्या नेतृत्वात कोविड टास्क फोर्सचे सदस्यांनी जिल्हाअधिकारी यांची भेट घेतली. त्यांना टास्क फोर्सच्या कार्याची माहिती दिली व पुढील रणनीतीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
जळगाव जमात-ए-इस्लामीतर्फे कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सीजन सिलेंडरचे वाटप करण्यात आले. सोबत कोरोना रुग्णांना मोफत समुपदेशनसाठी डॉक्टरचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत. प्रतिनिधी मंडळाने सरकारला मंजूर निधी आणि रुग्णांना मदत वाटण्यात यशस्वी भूमिका बजावण्याची विनंती केली. त्याचवेळी ओषधींचा काळा बाजारावर नियंत्रण ठेवण्याचीही विनंती करण्यात आली. ज्याद्वारे लोकांना रोगांच्या काळात सोय होईल. यावेळी जिल्हाधिकारी यांना जमात-ए-इस्लामीतर्फे करण्यात येणारे कल्याणकारी व समाजसेवी कामांची माहिती देण्यात आली. तसेच कोरोना रुग्णांबाबत शासनाच्या वैद्यकीय सेवामधील पुढील सुधारणाबद्दल सल्लामसलत करण्यात आली. व निवेदनही देण्यात आले. शिष्टमंडळात आरिफ देशमुख कोविड (टास्क फोर्स कॉर्डिनेटर) रेहान खाटीक वसीम भाई, शाहीद भाई आदींचा समावेश होता.