चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील नियमितपणे लिहिणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींची बैठक आज दिनांक 17 रोजी दुपारी बारा वाजता येथील विश्रामगरावर आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आगामी पत्रकार दिन 6 जानेवारी साजरा करण्यासाठी व्हॉइस मीडियाच्या माध्यमातून सर्व पत्रकारांनी मिळून हा दिवस साजरा करायचाआहे असा विचार मांडण्यात आला. आद्य पत्रकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारणीच्या माध्यमातून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. व्हॉइस मीडिया ही राज्यपातळीवरील संघटना असून या संघटनेत सर्वांनी एकत्र येऊन सभासद व्हावे, स्थानिक संघटनेला बळकटी आणण्यासाठी सर्वांनी एक दिलाने एकमताने पत्रकार दिन एकत्र यावे असे आवाहन यावेळी श्याम जाधव यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार रमेश जे .पाटील, पंकज पाटील, सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, मनोहर देशमुख, जितेंद्र शिंपी, रावसाहेब पाटील, मिलिंद सोनवणे, छोटू वार्डे, आदी मान्यवर पत्रकार यावेळी उपस्थित होते. पुढील बैठक 25 रोजी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली आहे आभार जाधव यांनी मानले.