मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सासरी मुक्कामी आलेल्या मेहुण्याने शालकाचा कुर्हाडीने वार करुन खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री तरुणाची हत्या झाली. विशाल वामन ठोसरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांपासून सासरी मुक्कामी आलेला त्याचा मेहुणा विजय सावकारे याने कुर्हाडीने वार करुन त्याची निर्घृणपणे खून केला आहे. विशालच्या मेव्हण्यानेच ही हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेनंतर संशयित मेहुणा फरार झाला आहे. दरम्यान, माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले आहेत.