जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जळगाव औरंगाबाद रस्त्यावर जळगाव तोलकाट्याजवळ सट्टा खेळणार्या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून १ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जळगाव औरंगाबाद रस्त्यावर जळगाव तोलकाट्याजवळ तरुण सट्टा खेळत असल्याची माहिती निरिक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस नाईक सचिन मुंढे, प्रदीप पाटील, यांच्या पथकाने जळगाव तोलकाट्याजवळ सट्टा खेळणार्या विकास रमेश सोनवणे (वय २७ रा. रामेश्वर कॉलनी) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ हजार ४५० रुपये रोख व सट्ट्ा खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सतीश गर्जे यांच्या फिर्यादीवरुन विकास सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
















