चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील ५ सरोवर संवर्धनासाठी १८ कोटी २८ लाख निधी मंजूर झाला आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी ५ सरोवर संवर्धनासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यात विसापूर, राजमाने, देवळी, कळमडू, ब्राम्हणशेवगे गावातील तलावांचे होणार पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन होणार. चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच मिळाला राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून भरगोस निधी मिळाला असून इतर गावातील तलावांना निधी मिळण्यासाठी देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा पाठपुरावा सुरू आहे.
गाव व तलावासाठी मंजूर निधी खालीलप्रमाणे
१) विसापूर – ३ कोटी ११ लक्ष
२) राजमाने – ३ कोटी
३) देवळी – ३ कोटी ८० लक्ष
४) कळमडू – ३ कोटी ८३ लक्ष
५) ब्राम्हणशेवगे – ४ कोटी ५५ लक्ष