TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव; शेतात गाठून हल्ला

vijay waghmare by vijay waghmare
May 27, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगातील कथित आर्थिक अपहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू होताच, तक्रारदार सचिन रवींद्र माळी यांच्या कुटुंबावर कुऱ्हाड आणि लाठ्या, काठ्यांनी जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मोरफळ शिवारात घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोरफळ येथील सचिन माळी (वय २७) यांनी मनरेगा योजनेतील खोट्या मस्टर हजेरी आणि पैशांच्या अपहाराबाबत २१३ पानांची विस्तृत तक्रार नाशिक विभागीय आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीच्या
गांभीर्यावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३० एप्रिल रोजी पारोळा येथील गट विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. ही कायदेशीर चौकशी सुरू झाल्यामुळे घोटाळ्यात सहभागी संशयितांचे धाबे दणाणले होते. तक्रार मागे घेण्यासाठी सचिन माळी यांच्यावर सतत दबाव आणला जात होता व धमक्या दिल्या जात होत्या. २२ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मोरफळ शिवारातील शेत गट नं. ८९/२ च्या बांधावर सचिन माळी यांचे काका छोटू हिरामण माळी हे काम करत असताना संशयितांनी तेथील झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यास सुरुवात केली. त्यास विरोध केला असता संशयित प्रवीण गोपिंचद माळी याने कुऱ्हाडीने छोटू माळी यांच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. तर, जमिनीवर पडलेल्या छोटू माळी यांना प्रशांत माळी व गणेश माळी यांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली. काकांना वाचवण्यासाठी धावून गेलेल्या सचिन माळी यांच्यावरही गणेश माळी याने काठीने हल्ला केला, ज्यामध्ये त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. जखमींवर धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू असतानाच, आरोपींच्या साथीदारांनी ग्रीन पार्क हॉटेलजवळ सचिन माळी यांच्या गाडीवर दगडफेक केली. या दुसऱ्या हल्ल्यात गाडीवर पाठीमागे बसलेले हरचंद सुखदेव माळी ही जखमी झाले.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

यांच्या विरोधात गुन्हे दाखल

पारोळा पोलिसांनी या प्रकरणी प्रवीण गोपिंचद माळी, प्रशांत प्रवीण माळी, गणेश प्रवीण माळी, गोपिंचद राजाराम माळी, मोतीलाल अर्जुन माळी, मोहन मोतीलाल माळी, राहुल मोतीलाल माळी, लाडकुबाई गोपिंचद माळी, गणेश अंबु माळी, छाया प्रवीण माळी, मयूर गणेश माळी आणि चेतन पोपट महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास हे. कॉ. हितेश चिंचोरे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMNREGA scam complainant fatally attacked with axe in Parola; 12 people booked

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालविणाऱ्यांवर होणार मकोकातंर्गत कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोंदूबाबाने केला गुराख्याचा निर्घुण खून ; कुदळीचे वार करून झाला होता फरार !

September 5, 2023

पिंप्री येथे विवीध विकास कामांचे भुमिपुजन सोहळा संपन्न

July 25, 2021

विश्व हिंदू परिषदेच्या महासचिवांचं वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले, राम मंदिरासाठीची चळवळ स्वातंत्र्यसंग्रामापेक्षाही मोठी

December 13, 2021

धरणगाव तहसिलदार यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी ; माधुरी अत्तरदे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

April 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group