जळगाव (प्रतिनिधी) राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकी बाबत आढावा घेण्यासाठी सरचिटणीस तथा निरीक्षक ॲड.किशोर शिंदें, राज्य उपाध्यक्ष तथा निरीक्षक संजय जामदार यांच्या अध्यक्षतेखाली दि.३१ जुलै रोजी जळगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकी बाबत शहरातील पद्मालय विश्रामगृहात जिल्ह्यातील ११ विधानसभेचा आढावा खालील प्रमाणे घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते १२ वाजता चाळीसगाव, पाचोरा-भडगाव व एरंडोल-पारोळा विधानसभा. (तिन्ही विधानसभा पदाधिकारी एकत्र बैठक होईल.) तर दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यंत भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, जळगांव विधानसभा. (चारही विधानसभा पदाधिकारी बैठक एकत्र होईल.), दुपारी १ ते २ अमळनेर व जळगाव ग्रामीण विधानसभा (दोन्ही विधानसभा पदाधिकारी बैठक एकत्र होईल.), दुपारी २ ते ३ चोपडा व रावेर विधानसभा (दोन्ही विधानसभा पदाधिकारी बैठक एकत्र होईल.)
या बैठकीत विधानसभा निहाय जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव,उपजिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, गट अध्यक्ष,गणअध्यक्ष,शाखाध्यक्ष,विभाग अध्यक्ष सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी, यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती सरचिटणीस तथा जळगाव जिल्हा विधानसभा निवडणुक निरीक्षक ॲड.किशोर शिंदें, जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी कळवली आहे.