जळगाव (प्रतिनिधी) कोविड बॅरेक व १२ नंबर बॅरेक या दोन्हींच्या मधल्या मोकळ्या जागेत भिंतीच्या पलीकडून एका अज्ञात व्यक्तीने जिल्हा कारागृहातील न्यायालयीन बंद्याला मोबाईल फेकून दिला होता. याप्रकरणी लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कैदी प्रशांत अशोक वाघ याच्यासह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा कारागृहमधील पोलीस शिपाई बुढन भिकन तडवी (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी बुढन तडवी हे सेफरेट/कोवीड विभागात कर्तव्यावर हजर होते. साय ५ ते ५ : ४५ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोविड बॅरेक व १२ नं बॅरेक या दोन्हीच्या मधल्या मोकळ्या जागेत भिंतीचे पलीकडुन मोबाईल फेकला. हा मोबाईल आरोपी प्रशांत अशोक वाघ या न्यायालयीन बंद्याने उचलून नेला. दरम्यान, बाहेरील कोणतीही वस्तु न वापरण्याचा आदेश असतांना सुध्दा अशोक वाघ याने मोबाईल स्वतः जवळ ठेवून घेतला म्हणुन याप्रकरणी लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. जंयत कुमावत हे करीत आहेत.