जळगाव (प्रतिनिधी) रणरणत्या उन्हामुळे उकाडा होत असल्याने पहाटे दरवाजा उघडा ठेवल्याने कंपनीच्या कामगारांच्या खोलीतून चोरट्यांनी दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना दि. २० एप्रिल रोजी साईनगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील साईनगरात एका खोलीमध्ये चार कामगार राहतात. सध्या वाढत्या तापमानामुळे उकाडाही वाढत आहे. पर्त्याच्या खोलीमध्ये उकाडा असह्य झाल्यामुळे या कामगारांनी पहाटे खोलीचा दरवाजा उघडा ठेवला होता. त्या वेळी चोरट्यांनी संधी साधत प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी रामेश्वर गबरू पवार (वय २५, रा. साईनगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.