भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय युवतीचा तिच्याच घराजवळ येत विनयभंग केल्याची घटना दि ३० रोजी घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय युवती घराच्या औट्यांवर झाडू मारत असताना संशयित आरोपी जितेंद्र सुधाकर मोरे हा तेथे आला व युवतीचा हात पकडून मी तुला लाईक करतो असे म्हणून युवतीच्या मानस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने त्याविरोधात युवतीच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.कैलास गीते हे करीत आहे.