धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या बाहेर लावलेली मोटारसायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात संकेत रमेश कुमठ (वय ३२, रा. खत्री गल्ली धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १२ एप्रिल २०२२ रोजी धरणगाव शहरातील रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या बाहेर हिरो होडा स्प्लेडर कंपनीची सिल्व्हर रंगाची मोटार सायकल क्र. (MH-१९ – AD-६०२०) ही कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ योगेश जोशी हे करीत आहेत.